विश्वविजेत्या इंग्लंडचा सर्वात वाईट पराभव, श्रीलंकेची चोख कामगिरी!

WhatsApp Group

ENG vs SL World Cup 2023 In Marathi : श्रीलंकेने विश्वविजेत्या इंग्लंडविरुद्ध 8 विकेट्सने मोठा विजय मिळवत वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ अवघ्या 156 धावांत आटोपला. सुरुवातीच्या दोन धक्क्यांनंतर समरविक्रम आणि निसांका यांनी अर्धशतके झळकावून संघाला 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवून दिला. निसांकाने षटकार ठोकत श्रीलंकेचा विजय साकारला. श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरी कुमाराला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

इंग्लंडचा डाव

जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान यांनी पहिल्या गड्यासाठी 45 धावा जोडल्यानंतर इंग्लंडची गळती सुरू झाली. बेअरस्टोने 30 तर मलानने 28 धावा केल्या. श्रीलंकेकडून कसुन रजिथा, अँजेलो मॅथ्यूज आणि लाहिरू कुमारा यांनी दमदार गोलंदाजी करत अवघ्या 100 धावांत इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने इंग्लंडसाठी सर्वाधिक 43 धावांची खेळी केली, पण तोही 31व्या षटकात बाद झाला आणि इंग्लंडच्या आशा मावळल्या. कप्तान जोस बटलरलाही फक्त 8 धावा करता आल्या. इंग्लंडला संपूर्ण संघ 33.2 षटकात 156 धावांत बाद झाला. लंकेकडून कुमाराने सर्वाधिक 3, रजिथा आणि मॅथ्यूज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेचा डाव

प्रत्युत्तरात इंग्लंडने श्रीलंकेच्या कुसल परेरा (4) आणि कुसल मेंडिस (11) यांना तंबूत धाडत सामन्यात रंगत निर्माण केली होती. पण सलामीवीर पथुम निसांका आणि सदिरा समरविक्रमा यांनी शतकी भागीदारी करत 25.4व्या षटकात संघाला विजय मिळवून दिला. निसांकाने 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 77 तर समरविक्रमाने 7 चौकार आणि एका षटकारांसह नाबाद 65 धावा फटकावल्या. इंग्लंडकडून डेव्हिड विली दोन विकेट घेऊ शकला.

दोन्ही संघांची Playing 11 (ENG vs SL)

इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद आणि मार्क वुड.

श्रीलंका – पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, सदिरा समरविक्रमा, चरिता असलंका, धनंजय डिसिल्व्हा, अँजेलो मॅथ्यूज, महिश थिक्षणा, कसून राजिथा, लाहिरू कुमारा आणि दिलशान मधुशंका.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment