VIDEO : क्रिकेटर पृथ्वी शॉवर हल्ला..! तरुणीकडून मारहाणीचा प्रयत्न; ‘हे’ होतं कारण!

WhatsApp Group

Fans Attacks Cricketer Prithvi Shaw : स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉ सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. दरम्यान, त्याच्यावर हल्ला झाल्याच्या बातम्या येत आहेत. एवढेच नाही तर त्याच्या मित्राच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अलीकडेच पृथ्वी शॉला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले होते, मात्र तो एकाही सामन्यात दिसला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रावर एका हॉटेलबाहेर बेसबॉलच्या बॅटने हल्ला करण्यात आला. शॉच्या मित्राच्या गाडीचेही नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉने २ लोकांसोबत सेल्फी काढला होता. यानंतर आणखी लोक त्याच्यासोबत आले आणि पुन्हा सेल्फी घेण्यास सांगू लागले. यावेळी पृथ्वीने नकार देत आपण आपल्या वैयक्तिक कामासाठी येथे आलो असल्याचे सांगितले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शॉचा मित्र आशिष सुरेंद्र यादव याने सांगितले की, यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठलाग करून पैसे द्या, अन्यथा खोट्या प्रकरणात अडकवू, अशी धमकी दिली.

हेही वाचा – Business Idea : स्वत:च्या केसांपासून करा कमाई..! महिन्याला मिळतील २५,००० रुपये

८ जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, जेव्हा आरोपीने सेल्फीचा अधिक आग्रह धरला तेव्हा पृथ्वी शॉच्या मित्राने हॉटेल मॅनेजरला फोन केला. यानंतर मॅनेजरने आरोपीला निघून जाण्यास सांगितले. यानंतर पृथ्वी शॉ हॉटेलमधून बाहेर आला तेव्हा काही लोक बेसबॉलच्या बॅट घेऊन हॉटेलबाहेर उभे होते. याप्रकरणी २ आरोपींची ओळख पटली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment