

Yuvraj Singh Gets Notice : टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर युवराज सिंग त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी नेहमीच चर्चेत असतो. युवराज सिंग त्याच्या मजेशीर सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे, पण यावेळी तो मोठ्या अडचणीत सापडला आहे. युवराज सिंगने गोव्यात काहीतरी केले आहे, त्यामुळे त्याला नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे.
युवराज सिंग अडचणीत
युवराज सिंगला गोवा पर्यटन विभागाने नोटीस बजावली आहे की त्याने मोरजिममधील व्हिला नोंदणी न करता ‘होमस्टे’ म्हणून चालवला आहे. या नोटीसमध्ये त्याला ८ डिसेंबर रोजी सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. गोवा पर्यटन व्यवसाय कायदा १९८२ अन्वये, नोंदणीनंतरच राज्यात ‘होमस्टे’ चालवता येईल.
हेही वाचा – सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसाठी गूड न्यूज..! CM शिंदेंचा ‘मोठा’ निर्णय
Goa Tourism Department issued notice to former cricketer Yuvraj Singh yesterday and initiated proceedings under the Registration of Tourist Trade Act for failure to register his villa, situated in Varchawada, Morjim, with the department: Department of Tourism, Goa
(File pic) pic.twitter.com/nppvoWp2Hr
— ANI (@ANI) November 23, 2022
राज्याच्या पर्यटन विभागाचे उपसंचालक राजेश काळे यांनी १८ नोव्हेंबर रोजी उत्तर गोव्यातील मोरजिम येथील युवराज सिंगच्या मालकीच्या व्हिला ‘कासा सिंग’ या पत्त्यावर युवराज सिंगला ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नोटीस बजावली. नोटीसमध्ये युवराज सिंगला पर्यटन व्यापार कायद्यांतर्गत मालमत्तेची नोंदणी न केल्याबद्दल दंडात्मक कारवाई (एक लाख रुपयांपर्यंत दंड) का सुरू करू नये अशी विचारणा करण्यात आली आहे.
युवराज सिंगला बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे, “हे खाली स्वाक्षरी केलेल्या व्यक्तीच्या निदर्शनास आले आहे की वरचेवाडा, मोरजिम, पेरनेम, गोवा येथे स्थित तुमचा निवासी परिसर कथितपणे होमस्टे म्हणून कार्यरत आहे आणि ‘Airbnb’ प्रमाणे ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बुकिंगसाठी उपलब्ध आहे.” विभागाने युवराजच्या एका ट्वीटचा देखील संदर्भ दिला आहे ज्यात त्याने म्हटले आहे की तो त्याच्या गोव्यातील घरी सहा लोकांना होस्ट करणार आहे आणि त्याचे बुकिंग फक्त ‘एअरबीएनबी’ वर असेल.