

Virat Kohli Century : भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने २३ नोव्हेंबर २०१९ रोजी कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. कोलकातामध्ये बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत विराटच्या बॅटमधून शतक आले होते. आता ३ वर्षे ३ महिने १७ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विराट कोहलीने कसोटीत शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीत (IND vs AUS 4th Test) विराटने शतक झळकावले.
विराट कोहलीचे कसोटीतील २८ वे शतक
विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील हे २८ वे शतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने सातव्यांदा तीन आकडी धावसंख्या गाठली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ७५ व्यांदा शतक ठोकले आहे. चौथ्या दिवशी उपाहारानंतर विराटने २४१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विराट कोहलीने आपले शतक पूर्ण करण्यासाठी केवळ ५ चौकार मारले. त्याने सर्वाधिक धावा विकेटच्या धावून काढल्या.
Virat Kohli scores a Test hundred for the first time in over three years 🎉#WTC23 | #INDvAUS | 📝 https://t.co/VJoLfVSeIF pic.twitter.com/V3TIf48iVc
— ICC (@ICC) March 12, 2023
हेही वाचा – PF Transfer : नोकरी बदलल्यावर पीएफ ट्रान्स्फर कसा कराल? ‘इथं’ जाणून घ्या ऑनलाइन प्रोसेस!
Virat Kohli 75Th International Century
100 In Test Cricket After 3 Years ✌🏻 pic.twitter.com/v8EOPa8vpn
— Vaibhav Bhola 🇮🇳 (@VibhuBhola) March 12, 2023
चौथ्या दिवशी संथ फलंदाजी
आज सामन्याच्या चौथ्या दिवशी विराट कोहलीने अतिशय संथ फलंदाजी केली आहे. पहिल्या सत्रात त्याने एकही चौकार मारला नाही. खेळपट्टी गोलंदाजांना मदत करू लागली आहे. पण विराटने संयम गमावला नाही आणि तब्बल ३ वर्षांनंतर कसोटीत शतक झळकावले. गेल्या वर्षी त्याने अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० आणि बांगलादेशविरुद्ध वनडेमध्ये शतक झळकावले होते. या वर्षाच्या सुरुवातीला विराटने श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये दोन शतके झळकावली होती.
bow down to virat kohli 75th international hundredpic.twitter.com/rrkmCtZi6M
— Kevin (@imkevin149) March 12, 2023
तीन वर्षे कसोटीत शांत फलंदाजी
गेली तीन वर्षे कसोटीत विराट कोहलीची बॅट पूर्णपणे शांत होती. त्याने २०२० मध्ये १९.३३ च्या सरासरीने ११६ धावा, २०२१ मध्ये २८.३१ च्या सरासरीने ५३६ धावा आणि २०२२ मध्ये २६.५च्या सरासरीने २८५ धावा केल्या. त्याला शेवटच्या १५ डावात अर्धशतकही करता आले नाही. या वर्षाची सुरुवात विराटसाठी चांगली झाली नाही. बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात विराटने १११ धावा केल्या होत्या. या मालिकेत पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फीने विराटला त्रस्त केले होते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!