

IND vs ENG Rohit Sharma New Records In Marathi : भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषक 2023 मधील 29 वा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात मैदानात उतरताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. कर्णधार म्हणून रोहितचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे (तीन्ही फॉरमॅट म्हणजे कसोटी, वनडे आणि टी-20). कर्णधारपदी शतक करणारा तो भारताचा सातवा खेळाडू ठरेल. याआधी महेंद्रसिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, विराट कोहली, सौरव गांगुली, कपिल देव आणि राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केली आहे. एकूणच, 100 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केलेला रोहित जगातील 50 वा खेळाडू ठरला आहे.
सर्व भारतीय कर्णधारांचे रेकॉर्ड
धोनी 332 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपदासह अव्वल स्थानावर आहे, तर अझरुद्दीनने 221 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. कोहलीने 213 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. गांगुलीने 195, कपिलने 108 आणि द्रविडने 104 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले. यापैकी फक्त धोनी आणि कोहली यांनी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. अझरुद्दीन, गांगुली, कपिल आणि द्रविड यांच्या काळात फक्त दोनच फॉरमॅट (कसोटी आणि एकदिवसीय) असायचे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम
याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने नवा विक्रम केला. रोहित शर्माचे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो 20वा आणि भारतीय म्हणून 5वा खेळाडू ठरला आहे.
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर/कप्तान), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वूड.