IND vs PAK Asia Cup 2022 : कॅप्टन रोहित शर्मानं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11

WhatsApp Group

Asia Cup 2022 : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील आशिया कप २०२२ स्पर्धेचा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगत आहे. आशिया चषकाच्या १५व्या मोसमातील हा केवळ दुसरा सामना असला तरी तो अंतिम सामन्यापेक्षा कमी नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट म्हटलं की एक पर्वणीच असते. त्यामुळं संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडं लागलं आहे. भारतानं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतानं या सामन्यात ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी दिली आहे.

टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असून बाबर आझम पाकिस्तान संघाचा कर्णधार आहे. याआधी, २०२१ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान २४ ऑक्टोबर रोजी दोन्ही संघ एकाच मैदानावर आमनेसामने आले होते. त्या सामन्यात पाकिस्तानचा संघ विजयी झाला होता आणि हा विजय पाकिस्तानचा विश्वचषक (वनडे आणि टी-२०) इतिहासातील पहिला विजय होता. अशा परिस्थितीत भारताला त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल आणि हा सामना चुरशीचा असणार आहे.

पाकिस्तानविरुद्ध भारताचा मजबूत रेकॉर्ड

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानशी दोन हात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर विराटनं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितला टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आलं. यानंतर त्याला वनडे आणि कसोटी संघाचीही कमान देण्यात आली. २००८ ते २०१८ या कालावधीत दहा वर्षात आशिया कपमध्ये भारताला पाकिस्तानकडून फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला आहे. २०१४ मध्ये मीरपूर येथे झालेल्या आशिया चषकाच्या सामन्यात पाकिस्ताननं भारताचा एक गडी राखून पराभव केला होता. शाहीद आफ्रिदीनं अश्विनच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार ठोकत पाकिस्तानला एका विकेटने रोमांचक विजय मिळवून दिला होता.

हेही वाचा – Asia Cup 2022: मॅचपूर्वी रोहित शर्माचा ‘तो’ सल्ला ऐकून बाबर आझम लाजला..! VIDEO व्हायरल

दोन्ही संघांची Playing 11

भारत – रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

हेही वाचा – Asia Cup 2022 : मॅचआधीच विराटनं दाखवला मोठेपणा! बाबर आझमबाबत म्हणाला, “तो जगातला…”

पाकिस्तान – बाबर आझम (कप्तान), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, फखर अहमद, खुशदल शाह, आसिफ अली, शादाब खान, मुहम्मद नवाज, नसीम शाह, हारिस रौफ, शाहनाझ दहानी

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment