IPL 2023 CSK vs PBKS : आयपीएल 2023च्या 41व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला थरारक पद्धतीने मात दिली. शेवटच्या चेंडूवर पंजाबला विजयासाठी 3 धावा हव्या असताना सिकंदर रझाने अप्रतिम फटका खेळूत आनंदोत्सव साजरा केला. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने नाबाद 92 धावांची जबरदस्त खेळी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या चेन्नईने 20 षटकात 4 बाद 200 धावा केल्या. महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या दोन चेंडूत दोन षटकार खेचून संघाची धावसंख्या 200 धावांपर्यंत पोहोचवली.
चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने आपल्या धावांमध्ये 16 चौकार आणि 1 षटकार ठोकला ऋतुराज गायकवाडने 37 आणि शिवम दुबेने 28 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंग, सॅम करन, राहुल चहर आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Raza and @PunjabKingsIPL stun #CSK with the highest-ever #TATAIPL chase at Chepauk by an away side 🤯#CSKvPBKS #IPLonJioCinema #TATAIPL #IPL2023 pic.twitter.com/FCZWvFFDFM
— JioCinema (@JioCinema) April 30, 2023
Last ball. MS Dhoni.
Don't think anything else needs to be said 🙂#CSKvPBKS #IPLonJioCinema #TATAIPL | @ChennaiIPL @msdhoni pic.twitter.com/Bpa7vtDPVv— JioCinema (@JioCinema) April 30, 2023
हेही वाचा – Rohit Sharma 36th Birthday : रोहित शर्माची संपत्ती किती? जवळपास ‘इतक्या’ कोटींचा मालक!
प्रत्युत्तरात पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली. शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे या संघाने पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 50 धावा केल्या आहेत. धवन 28 तर प्रभसिमरन सिंग 24 चेंडूत 42 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार मारले. मधल्या फळीत लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. लिव्हिंगस्टोनने 4 षटकारांसह 24 धावा केल्या. तर मशिष पशिरानाने वैयक्तिक 29 धावांवर करनचा त्रिफळा उडवला.
पंजाबला विजयाकडे घेऊन जाणारा जितेश शर्मा 19व्या षटकात बाद झाला. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना सिकंदर रझाने ओव्हर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका खेळला आणि धावा घेतल्या. यासह थरारक सामन्यात पंजाबने चेन्नईला 4 गड्यांनी मात दिली.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!