

IPL 2023 Final GT vs CSK Ravichandran Ashwin : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) फायनल रविवारी पावसामुळे होऊ शकली नाही. सोमवारी, 29 मे रोजी राखीव दिवशी गुजरात टायटन्सचा डाव संपल्यानंतर पावसाने पुन्हा खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या. चेन्नईने 3 चेंडूत केवळ 4 धावा केल्या होत्या की पाऊस आला आणि सामना थांबवावा लागला. पाऊस थांबला, पण सराव खेळपट्टी भिजल्यामुळे 29 मेच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सामना सुरू होऊ शकला नाही.
षटकांमध्ये कपात झाल्यास चेन्नईला कोणते लक्ष्य मिळेल? असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला होता. दरम्यान, टीम इंडिया आणि राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने विजेतेपदाची भविष्यवाणी केली. रवीचंद्रन अश्विनने ट्वीट केले की, जर षटके कापली तर चेन्नई सुपर किंग्जकडे सर्व विकेट आहेत. चेंडू ओला असेल आणि आऊटफिल्ड निसरडे असेल. सीएसकेचे 5 वे विजेतेपद असेल. त्याचा अंदाज खरा ठरला.
हेही वाचा – IPL 2023 Awards : ‘या’ खेळाडूला मिळाली गाडी…! जाणून घ्या कोणाला कोणते पुरस्कार मिळाले
चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य मिळाले
29 मे रोजी रात्री 11.30 वाजता पंचांनी मैदानाची पाहणी केली. यानंतर 30 मे रोजी दुपारी 12.10 वाजता सामना सुरू झाला. डकवर्थ लुईस स्ट्रेन नियमानुसार चेन्नई सुपर किंग्जला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य मिळाले. संघाने शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य गाठले. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी त्याने हवामानाच्या अंदाजामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या. साई सुदर्शनने शानदार फलंदाजी करताना 47 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 96 धावा केल्या. वृद्धिमान साहाने 39 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 54 धावा केल्या. शुभमन गिलने 20 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 39 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने 12 चेंडूत 21 धावा केल्या.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!