IPL 2023 : मराठमोळ्या केदार जाधवचं कमबॅक..! ‘या’ टीमकडून खेळणार; मिळाले ‘इतके’ पैसे!

WhatsApp Group

IPL 2023 Kedar Jadhav : आयपीएलच्या 16 व्या मोसमात दुखापतग्रस्त खेळाडू बाहेर पडण्याची प्रक्रिया सातत्याने पाहायला मिळत आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने दुखापतग्रस्त डेव्हिड विलीच्या जागी केदार जाधवला त्यांच्या संघाचा भाग बनवण्याची घोषणा केली आहे. आरसीबीने जाधवला त्याच्या 1 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसाठी संघात समाविष्ट केले आहे. विली या हंगामात आरसीबीसाठी केवळ 4 सामने खेळू शकला, ज्यामध्ये त्याने 3 विकेट घेतल्या.

केदार जाधव यापूर्वी जिओ सिनेमासाठी मराठी भाषेत समालोचनाची भूमिका करत होता. 2010 च्या मोसमात केदार जाधवने आयपीएलमध्ये पदार्पण केले. केदारने यांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत 93 सामने खेळले आहेत, त्यापैकी 80 डावात फलंदाजी करताना 22.15 च्या सरासरीने एकूण 1196 धावा केल्या आहेत. यादरम्यान केदारच्या बॅटमधून 4 अर्धशतकांच्या खेळी पाहायला मिळाल्या. जाधव यापूर्वीही आरसीबी संघाचा भाग होता, ज्यामध्ये त्याला संघाकडून एकूण 17 सामने खेळण्याची संधी मिळाली.

हेही वाचा – Health : दिवसाढवळ्या झोपणं चांगलं असतं की वाईट? शरीरावर काय परिणाम होतो?

आयपीएलच्या या हंगामातील आरसीबीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर 8 सामने खेळल्यानंतर बंगळुरूने केवळ 4 सामने जिंकले आहेत. या हंगामात आतापर्यंत संघासाठी एक समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे मधल्या फळीकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणे. त्यामुळेच केदार जाधवला संघात सामील करून घेण्याचा निर्णय घेतल्याने तो मधल्या फळीला बळकट करेल, असे बोलले जात आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment