IPL 2023 : अजिंक्य रहाणेचा सुपला शॉट..! चेंडू सीमारेषापार; पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 Ajinkya Rahane Supla Shot : कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू अजिंक्य रहाणेने सर्वांची वाहवा मिळवली. रहाणेने आपल्या जलद फलंदाजीने सर्वांना थक्क केलेच, सोबत सुंदर शॉट्सही खेळले. यात त्याने सुपला शॉटही खेळला. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रहाणे चांगल्या लयीत दिसला. या सामन्यात चेन्नईने कोलकातासमोर 20 षटकात 4 बाद 235 असा विशाल स्कोअर उभारला. रहाणेने 29 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 71 धावा ठोकल्या.

कोलकाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव डावाचे 14वे षटक टाकायला आला. या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर रहाणेने 2 षटकार ठोकले. यातील पहिला शॉट रहाणेने सुपला शॉट खेळला. हा चेंडू विकेटकीपरच्या डोक्यावरून षटकार गेला.

हेही वाचा – IPL 2023 : दांडी गुल बॉलिंग..! सिराजचा बॉल बटलरला कळायच्या आधी वळला; पाहा Video

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर/कर्णधार), मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, महिष थिक्षणा.

कोलकाता नाइट रायडर्स – एन जगदीशन (विकेटकीपर), जेसन रॉय, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, सुनील नरेन, डेव्हिड वीजा, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment