

IPL 2023 Gautam Gambhir Kohli Kohli Chant : लखनऊ आणि कोलकाता (KKR vs LSG) यांच्यातील सामन्यादरम्यान पुन्हा एकदा असाच प्रकार घडला ज्याची आजकाल अधिक चर्चा होत आहे. नवीन उल हक आणि गौतम गंभीरला पाहून पुन्हा एकदा ईडन गार्डन्सवरील चाहते ‘कोहली-कोहली’ ओरडताना दिसले. आता एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये गंभीरला पाहिल्यानंतर चाहते ‘कोहली-कोहली’ म्हणू लागतात, त्यानंतर गंभीर एक रिअॅक्शन देतो.
एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये गंभीर टीमच्या ड्रेसिंग रूमकडे जाताना दिसत आहे. मग गंभीरला पाहून चाहते ‘कोहली-कोहली’ म्हणू लागतात. विराटचे नाव ऐकून गंभीर चाहत्यांकडे पाहून तो काही हातवारे करतानाही दिसत आहे. इतकेच नाही तर गंभीरच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भावही दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
"Kohli Kohli" chants on insecure gambhir's face 😂🔥pic.twitter.com/3o2b5gNCXq
— leisha (@katyxkohli17) May 21, 2023
हेही वाचा – IPL 2023 : चेन्नई दरवेळी प्लेऑमध्ये कशी पोहोचते? धोनीने सांगितले सीक्रेट!
आयपीएलमध्ये RCB विरुद्धच्या सामन्यादरम्यान टीम मेंटॉर गंभीर आणि कोहली यांच्यात बाचाबाची झाली होती. तेव्हापासून लखनऊ सुपरजायंट्सचा सामना झाला की, गंभीर आणि नवीनला पाहून चाहते कोहली-कोहली म्हणू लागतात. केकेआरविरुद्धच्या सामन्यादरम्यान ईडन गार्डन्समध्येही असेच दृश्य पाहायला मिळाले.
कोलकाताविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर लखनऊचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पात्र ठरला आहे. आता RCB आणि मुंबई इंडियन्स यांच्यापैकी एक संघ प्लेऑफमध्ये पात्र ठरू शकतो. जर RCB पात्रता मिळवण्यात यशस्वी ठरला तर प्लेऑफमध्ये पुन्हा एकदा RCB आणि लखनऊ यांच्यात लढत होऊ शकते.