IPL 2023 : विराट, गंभीर, नवीनला ‘जब्बर’ शिक्षा..! मैदानातील भांडण आलं अंगाशी

WhatsApp Group

IPL 2023 Virat Kohli Gautam Gambhir Fight : आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (LSG vs RCB) यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर हे आपापसात भिडले. या भांडणामुळे दोन्ही खेळाडूंचे जब्बर नुकसान झाले आहे. बीसीसीआयने दोघांना मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला आहे. बंगळुरूच्या विजयानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली. परिस्थिती इतकी बिघडली की खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला.

विराट कोहली आणि गौतम गंभीर मधल्या मैदानावर आदळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोघेही आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 2 अंतर्गत दोषी आढळले आहेत. कोहली आणि गंभीरचे संपूर्ण सामन्याचे शुल्क कापण्यात आले आहे. विराट आणि गंभीर मैदानावर एकमेकांशी भिडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी केकेआरचे कर्णधार असताना गंभीरचे कोहलीसोबत जोरदार वाद झाले होते. त्याचबरोबर लखनऊचा गोलंदाज नवीन-उल-हकलाही मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा – IPL 2023 : विराट आणि गंभीर पुन्हा भिडले..! हात मिळवण्याच्या वेळेला घडलं ‘असं’; पाहा Video

कोणाच्या फीमध्ये किती कपात?

  • विराट कोहली – 1.07 कोटी (100%)
  • गौतम गंभीर – 25 लाख (100%)
  • नवीन-उल-हक – 1.79 लाख (50%)

सामना झाल्यानंतर गौतम गंभीरचा संयम सुटला आणि तो रागाने विराट कोहलीला सामोरे गेला. एकानाच्या मैदानावर पारा एवढा तापला की, हे पाहून सगळेच थक्क झाले. दोघांचा राग एवढा होता की या शाब्दिक युद्धाचे रुपांतर हाणामारीत कधी होईल याची खात्री नव्हती. अशा परिस्थितीत फाफ डुप्लेसी, केएल राहुल आणि अमित मिश्रा यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. गौतम आणि विराट कोहली यांच्यातील या जोरदार वादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment