IPL 2023 : विराट आणि गंभीर पुन्हा भिडले..! हात मिळवण्याच्या वेळेला घडलं ‘असं’; पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 Virat Kohli vs Gautam Gambhir Fight : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये पुन्हा एकदा विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांशी भिडताना दिसले. सोमवारी (1 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) सामन्यानंतर हे भांडण समोर आले. या सामन्यात बंगळुरूने लखनऊचा त्यांच्याच घरच्या मैदानावर 18 धावांनी पराभव केला. सामना जिंकण्यासाठी बंगळुरूने संघाने लखनऊला 127 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊचा संघ 108 धावांवर गारद झाला. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांना भेटत असताना विराट आणि गंभीरमध्ये वाद झाला.

कोहली आणि गंभीर यांच्यात वादावादी

दरम्यान, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात काही गोष्टीवरून वाद सुरू होता. वाद इतका तापला की बाकीचे खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना बचावासाठी यावे लागले. त्याचे व्हिडिओ आणि फोटो खूप व्हायरल होत आहेत. लखनऊ संघाचा अमित मिश्रा आणि बंगळुरू संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसही मदतीला आल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. तत्पूर्वी सामना संपला तेव्हा गौतम गंभीरने विराटशी हस्तांदोलन करणे टाळले. आयपीएल 2013 च्या मोसमातही कोहली आणि गंभीर यांच्यात चुरशीची लढत झाली होती. तेव्हा गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. पण यावेळी तो लखनऊ संघाचा मार्गदर्शक आहे.

हेही वाचा – IPL 2023 : स्लो पिच, खेळाडूंमध्ये राडा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय!

असा रंगला सामना…

या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संघाने 9 गडी गमावून 126 धावा केल्या. बंगळुरूकडून कर्णधार डू प्लेसिसने 40 चेंडूत सर्वाधिक 44 धावा केल्या. त्याच्याशिवाय विराट कोहलीने 31 धावांची खेळी खेळली. तर दिनेश कार्तिकने 16 धावा केल्या. लखनौकडून नवीन उल हकने 3 बळी घेतले. तर अमित मिश्रा आणि रवी बिश्नोई यांनी 2-2 विकेट घेतल्या.

लखनऊसमोर 127 धावांचे लक्ष्य होते. त्यांचा कर्णधार केएल राहुल क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडला. शेवटी तो फलंदाजीसाठी आला, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अशा स्थितीत लखनऊचा संघ केवळ 108 धावांवर गारद झाला. लखनऊ संघाकडून कृष्णप्पा गौतमने सर्वाधिक 23 धावा केल्या. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. बंगळुरूकडून कर्ण शर्मा आणि जोश हेझलवूडने 2-2 बळी घेतले. तर मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल आणि वानिंदू हसरंगा यांना 1-1 यश मिळाले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment