IPL 2023 : डेब्यु मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकरने काय केलं? किती धावा दिल्या?

WhatsApp Group

IPL 2023 Arjun Tendulkar Debut : आयपीएल २०२३ मध्ये आज वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सला ५ गड्यांनी धूळ चारली. या सामन्यात सूर्यकुमार यादवने मुंबईचे नेतृत्व केले, तर रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला. शिवाय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुननेही या सामन्यात पदार्पण केले.

नाणेफेक जिंकलेल्या मुंबईने प्रथम गोलंदाजी घेतली. व्यंकटेश अय्यरने ६ चौकार आणि ९ षटकारांसह ५१ चेंडूत १०४ धावा ठोकल्या. कोलकाताने त्याच्या फलंदाजीच्या जोरावर २० षटकात ६ बाद १८५ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात ईशान किशनचे धमाकेदार अर्धशतक आणि सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने हे लक्ष्य १७.४ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केले. ईशानने २५ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ५८ धावा ठोकल्या. सूर्यकुमारने २५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४३ धावा केल्या.

हेही वाचा – World Most Expensive Fish : जगातील सर्वात महागडा मासा..! जाणून घ्या नाव, किंमत

अर्जुनची कामगिरी

अर्जुनने या सामन्यात २ षटके टाकली आणि १७ धावा दिल्या. मुंबईच्या डावाचे पहिलेच षटक अर्जुनने टाकले. त्याने १ वाईडही टाकला. सामन्यात अर्जुनला एकही विकेट घेता आली नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment