IPL 2023 MI vs RR : आयपीएल 2023 मध्ये एप्रिल महिन्याची शेवटची तारीख प्रेक्षकांसाठी रंगतदार ठरली. वानखेडे मैदानावर रंगलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रंगतदार विजय मिळवत कप्तान रोहित शर्माला त्याच्या 36व्या वाढदिवसाचे गिफ्ट दिले. स्फोटक खेळाडू टिम डेव्हिड, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा मुंबईच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
शेवटच्या षटकात 17 धावांची गरज..
मुंबईला विजयासाठी शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. टिम डेव्हिड आणि तिलक वर्मा खेळपट्टीवर होते. राजस्थानकडून जेसन होल्डरने 20वे षटक टाकले. या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार ठोकत डेव्हिडने मुंबईला विजय मिळवून दिला. त्याने फक्त 14 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 45 धावा ठोकल्या. सूर्यकुमारने 8 चौकार आणि 2 षटकारांसह 55 धावांची खेळी केली. कॅमेरून ग्रीनने 44 तर तिलक वर्माने 29 धावा जोडल्या.
Tim David, take a bow 🔥
What a way to leave Wankhede and Sachin Tendulkar all smiles 😀#IPL2023 #TATAIPL #MIvRR #IPL1000 | @mipaltan @timdavid8 pic.twitter.com/evvQRJCEFu
— JioCinema (@JioCinema) April 30, 2023
1️⃣0️⃣0️⃣0️⃣th IPL match. Special Occasion…
…And it ends with an electrifying finish courtesy Tim David & @mipaltan 💥💥💥
Scorecard ▶️ https://t.co/trgeZNGiRY #IPL1000 | #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/qK6V5bqiWV
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
हेही वाचा – IPL 2023 : यशस्वी जयस्वालची सेंच्युरी! मुंबईच्या गोलंदाजांना धुतलं; 1000व्या मॅचमध्ये रचला इतिहास
Mumbai’s monster has 𝗥𝗜𝗦𝗘𝗡 😤#OneFamily #MIvRR #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @timdavid8 pic.twitter.com/iUYYO7NNgE
— Mumbai Indians (@mipaltan) April 30, 2023
यशस्वी जयस्वालच्या सुंदर शतकाच्या जोरावर राजस्थानने मुंबईसमोर 20 षटकात 7 बाद 212 धावा उभारल्या. यशस्वीने 16 चौकार आणि 8 षटकारांसह 124 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात मुंबईकडून रोहित शर्मा (2) इशान किशन (28) यांना चांगली सलामी देता आली नाही. पण सूर्यकुमार, तिलक, ग्रीन आणि डेव्हिडच्या फलंदाजीमुळे राजस्थानला मात खावी लागली.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!