IPL 2023 : मुंबई इंडियन्स तय्यार..! मिळाला ‘नवा’ हेड कोच; RCB कडून खेळलाय पठ्ठ्या!

WhatsApp Group

Mumbai Indians New Coach : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सनं पुढील हंगामासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत, फ्रेंचायझीनं आपल्या संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक, दक्षिण आफ्रिका संघाचा माजी स्टार यष्टीरक्षक मार्क बाउचरला नियुक्त केलं आहे. याआधी ही जबाबदारी श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने सांभाळत होता, पण फ्रेंचायझीने त्याला बढती दिली आहे. मुंबई फ्रेंचायझीनं जयवर्धनेची ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स म्हणून नियुक्ती केली आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त, फ्रेंचायझीकडं परदेशी लीगमध्येही दोन संघ आहेत. हे संघ एमआय एमिरेट्स आणि एमआय केप टाऊन आहेत. एमिरेट्स संघ हा आंतरराष्ट्रीय लीग टी-२० आणि केपटाऊन दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमधील संघ आहे. जयवर्धने आता तिन्ही संघांचा जागतिक प्रशिक्षकही असतील. म्हणजेच मुंबई इंडियन्ससह तिन्ही संघांसाठी स्वतंत्रपणे तीन नवीन प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तिन्ही संघांमध्ये समन्वय राखण्यासाठी जयवर्धने संघाच्या मुख्य प्रशिक्षकांशी जवळून काम करेल.

हेही वाचा – IPL स्पॉट फिक्सिंग, मुंबई मॉडेल, कपडे विक्री आणि पाकिस्तानी अंपायर असद रौफ!

४५ वर्षीय मार्क बाउचरनं याआधीही आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. तो २०१६ मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा यष्टीरक्षक प्रशिक्षक होता. याशिवाय त्यानं आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून कोलकाता संघासाठी सामनेही खेळले आहेत. यासोबतच बाउचर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) क्रिकेटही खेळला. त्यानं २००८ ते २०११ पर्यंत आयपीएलमध्ये एकूण ३१ आयपीएल सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ३९४ धावा केल्या.

बाउचर हा दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. मात्र, त्यानं या पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर तो आफ्रिकन संघाचे प्रशिक्षकपद सोडणार आहे. राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होण्यापूर्वी मार्क बाउचरनं दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत क्रिकेटमध्येही प्रशिक्षकपद भूषवले आहे.

हेही वाचा – गुजरातचा माणूस अचानक बनला करोडपती! खात्यात आले ११ कोटी आणि पुढे..

मार्क बाउचर पुढील आयपीएल २०२३ हंगामात सहाव्यांदा मुंबई संघासाठी विजेतेपद जिंकण्याच्या इराद्यानं कोचिंग करणार आहे. मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. मुंबई संघ २०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२० मध्ये चॅम्पियन झाला. नियुक्तीनंतर बाउचर म्हणाला, “मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे हा सन्मान आणि विशेषाधिकार आहे. मुंबई इंडियन्सचा इतिहास आणि कामगिरीमुळे तो क्रीडा जगतातील सर्वात यशस्वी फ्रेंचायझींपैकी एक आहे. या आव्हानासाठी मी तयार आहे.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment