IPL 2023 : हवेत उडणाऱ्या शिखर धवनला बघायचंय? हा Video पाहाच!

WhatsApp Group

IPL 2023 Fantastic Catch By Shikhar Dhawan : आयपीएल 2023 च्या 64व्या सामन्यात धर्मशाला येथे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (PBKS vs DC) आमनेसामने आले. या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि कप्तान डेव्हिड वॉर्नर यांनी चांगली सुरुवात केली. दोघेही मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असताना शिखर धवनने जबरदस्त कॅच घेत दिल्लीला धक्का दिला.

वॉर्नर आणि शॉच्या दमदार फलंदाजीमुळे दिल्लीने 10 षटकात बिनबाद 93 धावा फलकावर लावल्या. धवनने 11वे षटक सॅम करनने टाकले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वॉर्नरने चुकीचा फटका खेळला आणि संथ गतीचा हा चेंडू सरळ दिशेने हवेत गेला. धवनने कवरला क्षेत्ररक्षण करणाऱ्या धवनने तिथे धावत जाऊन हा कॅच टिपला. या कॅचनंतर धवनने मांडी थोपटत सेलिब्रेशनही केले.

हेही वाचा – बायकोचा वाढदिवस विसरला तर नवऱ्याला 5 वर्षाचा तुरुंगवास!

दिल्लीची दमदार बॅटिंग!

डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ़ यांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची दमदार भागीदारी रचली. पंजाबकडून सॅम करनला वॉर्नरच्या रुपात पहिले यश मिळाले. वॉर्नरने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 46 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या रायली रुसोने आक्रमक फटके खेळले. करनने अर्धशतक ठोकलेल्या पृथ्वीला बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. पृथ्वीने 7 चौकार आणि एका षटकारासह 54 धावा केल्या. 17व्या षटकात रुसोने आपले अर्धशतक ओलांडले. रुसोला फिल सॉ़ल्टनेही साथ दिली. त्याने 2 षटकारांसह नाबाद 22 धावा केल्या. रुसोने 37 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 82 धावा केल्या. दिल्लीने 20 षटकात 2 बाद 213 धावा केल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment