

IPL 2023 Playoffs : आयपीएल 2023 च्या प्लेऑफमधील 4 संघांचा निर्णय झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सह 6 संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लीगमधील शेवटचा गट सामना झाला. या सामन्यात विराट कोहलीची टीम आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने बंगळुरूचे चाहते दु:खी झाले. आरसीबी विरोधकांनीही आनंद साजरा केला. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सनेही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवाला चोख प्रत्युत्तर दिले.
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडण काही नवीन नाही. विराट आता बंगळुरूचा स्टार परफॉर्मर आहे, पण कर्णधार नाही. त्याचवेळी गंभीर आता लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटर आहे. अशाप्रकारे विराट कोहली विरुद्ध गौतम गंभीर हा वाद आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स असा झाला आहे.
विराट कोहलीचा संघ आरसीबी रविवारी शेवटचा सामना गमावल्यानंतर आयपीएलच्या प्लेऑफमधून बाहेर पडला, तेव्हा लखनऊ सुपर जायंट्सने ट्वीट केले. या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘Give it? Take it? Let’s leave it. Well fought, @RCBTweets. See you next season…’ पहिल्या दृष्टीक्षेपात, हे एक साधे ट्वीट वाटू शकते. पण तसे नाही.
हेही वाचा – देशात होती 10,000 रुपयांची नोट! तिचं पुढं काय झालं? नक्की वाचा!
10 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 1 गडी राखून पराभव केला. यानंतर लखनऊने त्याच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केले. This is how you… PLAY BOLD लखनऊ सुपर जायंट्सने 9 विकेट्सवर 213 धावा करून सामना जिंकला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 1 मे रोजी या पराभवाचा बदला घेतला. या दिवशी विराट कोहलीच्या संघाने लखनऊचा सहज पराभव केला. यानंतर आरसीबीने आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केले. Adab se Haraye! #PLAY BOLD.
आयपीएल प्लेऑफबद्दल बोलायचे झाल्यास, गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स टॉप-4 मध्ये राहून पुढील फेरीसाठी पात्र ठरले आहेत. गुजरात टायटन्सने सर्वाधिक 10 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनी अनुक्रमे 17-17 गुणांसह दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. मुंबई इंडियन्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले.