

IPL 2023 RR vs CSK MS Dhoni wrong DRS : महेंद्रसिंह धोनीला क्रिकेटचा खेळ चांगला समजतो यात शंका नाही. त्याची झलक तो मैदानावर सामन्यांदरम्यान दाखवतो. त्याच वेळी, त्याने घेतलेला DRS बहुतेक बरोबर जातो, म्हणून चाहत्यांनी डीआरएसला ‘धोनी रिव्ह्यू सिस्टम’ असे म्हटले आहे. मात्र, गुरुवारी धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध घेतलेला डीआरएस चुकीचा ठरला. हे पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले.
आयपीएल 2023 च्या 37 व्या सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराने घेतलेला डीआरएस व्यर्थ गेला. या सामन्यातील चौथे षटक टाकण्यासाठी महिष थिक्षणा आला होता. थिक्षणाचा तिसरा चेंडू यशस्वी जयस्वालने स्वीप करण्याचा प्रयत्न केला पण तो पॅडवर आदळला. थोड्याच वेळात थिक्षणा आणि धोनीने एलबीडब्ल्यूसाठी अपील केले, पण अंपायरने बोट वर केले नाही.
हेही वाचा – Business Idea : बक्कळ नफा देणारा व्यवसाय..! जॉबसोबत करा ‘हा’ बिजनेस; सरकारही करेल मदत!
थिक्षणाने धोनीला डीआरएस घेण्यास सांगण्याआधीच धोनीने डीआरएसचा इशारा केला. पण रिप्लेमध्ये चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेला असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत धोनीने घेतलेला डीआरएस व्यर्थ गेला. या सामन्यात जयस्वालने चौफेर फटकेबाजी केली. त्याने 43 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 77 धावा केल्या. तुषार देशपांडेने त्याला बाद केले.
DRS Means #Dhoni Review System Bro 🔥..#CSKvRR pic.twitter.com/J5N1VmhhIx
— Thambiraj Gounder (@ShreeThambiraj) April 27, 2023
— Washington Ydav (@WashingtonYdav) April 27, 2023
दोन्ही संघांची Playing 11
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (विकेटकीपर आणि कर्णधार), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवीचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर आणि कर्णधार), मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महिष थिक्षणा, आकाश सिंग.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!