IPL 2023 : जोस बटलरचा 112 मीटर लांब षटकार..! प्रेक्षकांचा जल्लोष; पाहा VIDEO

WhatsApp Group

IPL 2023 Jos Buttler 112 Meter Six : इंग्लंडचा स्टार फलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने आयपीएलमधील सर्वात लांब षटकार ठोकला आहे. बुधवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध (RR vs LSG) त्याने गगनभेदी षटकार ठोकला. त्याचा हा षटकार देखील आयपीएल 2023 मधील दुसरा सर्वात लांब षटकार होता. यासह बटलरने आयपीएल इतिहासातील 8 वा सर्वात लांब षटकार मारला आहे.

जोस बटलरने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध डावाच्या पाचव्या षटकात हा जबरदस्त षटकार मारला. त्याने युवा गोलंदाज युधवीर सिंग चरकच्या दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू डीप मिडविकेटवर थेट सीमारेषेवर धा़डला. हा त्याचा डावातील पहिला षटकारही होता. या सामन्यात प्रथम खेळताना लखनऊ सुपर जायंट्सने राजस्थानला 155 धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात बटलरने 4 चौकार आणि एका षटकारासह 40 धावा केल्या.

हेही वाचा – टाटाचा धमाका..! भारताच्या पहिल्या ‘ट्विन’ सिलिंडर CNG कारची बुकिंग सुरू

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब षटकाराचा विक्रम अॅल्बी मॉर्केलच्या नावावर आहे, ज्याने 2008 च्या पहिल्या हंगामात CSK साठी 125 मीटरचा षटकार मारला होता. त्यानंतर या लीगमध्ये 124, 122, 120, 119, 117 आणि 115 मीटरचे षटकार मारले गेले आहेत. चालू हंगामातील आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार 115 मीटरचा आहे, जो लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने मारला होता.

IPL 2023 मधील 5 सर्वात लांब षटकार

  • फाफ डु प्लेसिस (RCB vs LSG) – 115 मीटर
  • जोस बटलर (RR vs LSG) – 112 मीटर
  • शिवम दुबे (CSK vs RCB) – 111 मीटर
  • केएल राहुल (LSG vs RR) – 103 मीटर
  • शिवम दुबे (CSK vs LSG) – 102 मीटर

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment