

IPL 2023 Jos Buttler Missed Century : आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (RR vs SRH) सामन्यात राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने तुफानी अंदाजात 95 धावा ठोकल्या. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवरील सामन्यात बटलर ज्या अंदाजात फटकेबाजी करत होता, ते पाहून तो शतक साकारेल असे वाटत होते. पण हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने कमाल यॉर्कर टाकत त्याला पायचीत पकडले.
मागच्या हंगामात आपल्या फलंदाजीने वादळ निर्माण केलेल्या बटलरला या हंगामात म्हणावी तितकी चांगली फलंदाजी करता आली नव्हती. पण हैदराबादविरुद्ध बटलरने फॉर्मात येत जबरदस्त फलंदाजी केली. बटलरने 59 चेंडुंचा सामना करत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 95 धावांची खेळी केली.
Did You Watch?
A fine yorker!
A successful DRS call.
…that's what it took to end the brilliant Buttler show!#TATAIPL | #RRvSRH | @BhuviOfficial pic.twitter.com/veuzutLtEz— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
राजस्थानचा हैदराबादसमोर डोंगर!
टॉस जिंकलेल्या राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि बटलरने 54 धावांची सलामी दिली. यशस्वीने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 35 धावा केल्या. त्यानंतर कप्तान संजू सॅमसनने बटलरसोबत फटकेबाजी केली. सॅमसनने अर्धशतक केले. त्याने 4 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 66 धावा केल्या. हैदराबादचे गोलंदाज या दोघांपुढे निष्प्रभ ठरले. हैदराबादचा फिरकीपटू मयंक मार्कंडे महागडा ठरला. त्याने 4 षटकात 51 धावा दिल्या. राजस्थानने 20 षटकात 2 बाद 214 धावा उभारल्या.
हेही वाचा – IPL 2023 : असा कॅच तुम्ही कधीच पाहिला नसेल..! राशिद खानची ‘कमाल’; पाहा Video
दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कप्तान), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, विव्रत शर्मा, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कप्तान/विकेटकीपर), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!