

CSK vs RCB Rachin Ravindra Catch : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची चांगली सुरुवात झाली. कप्तान फाफ डू प्लेसिस सुंदर खेळत असताना सीएसकेचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने त्याला थांबवले. मुस्तफिजुरच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना फाफ झेलबाद झाला.
डीप मिडवेकेटला तैनात असलेल्या रचिन रवींद्रने पुढे धावत येत सूर मारला आणि आश्चर्यचकित झेल टिपला. रचिनचा हा सीएसकेसाठी पहिलाच सामना आहे. त्याला ऑक्शनमध्ये 1.8 कोटींची बोली लावून सीएसकेने आपल्यात घेतले. मिस्तफिजुरने फाफनंतर रजत पाटीदारला शून्यावर तंबूत पाठवले. पुढच्या षटकात दीपक चहरने ग्लेन मॅक्सवेलला पहिल्याच चेंडूवर बाद केले. धोनीने यष्टीपाठी दोन्ही झेल घेतले.
हेही वाचा – IPL 2024 CSK Vs RCB : पहिली मॅच, पहिला टॉस…आरसीबीची पहिली बॅटिंग, पाहा Playing 11!
दोन्ही संघांची Playing 11
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी, दीपक चहर, महेश थेक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा