IPL 2024 KKR vs LSG : फिल सॉल्ट आणि श्रेयस अय्यरचे तुफान! केकेआरची लखनऊवर सहज मात

WhatsApp Group

IPL 2024 KKR vs LSG : आयपीएल 2024 चा 28 वा सामना आज 14 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपरजायंट्स (KKR VS LSG) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात केकेआरने 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जे प्रभावी ठरले. केकेआरसाठी फिल सॉल्टने शानदार अर्धशतक झळकावले. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा हा चौथा विजय आहे.

प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनऊ सुपरजायंट्सने काही विशेष फलंदाजी केली नाही. लखनऊकडून सलामीला आलेल्या क्विंटन डी कॉकने 8 चेंडूत 10 आणि केएल राहुलने 27 चेंडूत 39 धावा केल्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दीपक हुडाने फलंदाजी केली नाही. तो 10 चेंडूत 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्कस स्टॉइनिसने 5 चेंडूत 10 धावा केल्या. त्याचवेळी एलएसजीकडून निकलस पुराणने चांगली फलंदाजी करत 32 चेंडूत 45 धावा केल्या. अशाप्रकारे लखनऊची धावसंख्या 162 धावांपर्यंत पोहोचली.

हेही वाचा – Iran-Israel War : वाढत्या महागाईचा धोका, शेअर बाजार कोसळण्याचं संकट, जाणून घ्या या युद्धाचा भारतावर कसा परिणाम होईल!

आता 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी केकेआरकडून सलामीला आलेल्या फिल सॉल्टने तुफानी खेळी केली. त्याने 47 चेंडूत 89 धावांची खेळी खेळली. त्याला श्रेयस अय्यरनेही साथ दिली. अय्यरने 38 चेंडूत 38 धावा केल्या. या सामन्यात सुनील नरेन आणि अंगकृष्ण रघुवंशीची फलंदाजी चालली नाही. लखनऊकडून मोहसिन खानने 2 बळी घेतले. याशिवाय कोणत्याही गोलंदाजाला एकही विकेट आपल्या नावावर करता आली नाही. या विजयासह केकेआर संघाचे 8 गुण झाले आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment