EPFO 3.0 ATM Withdrawal : केंद्र सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच ‘EPFO 3.0’ ही नवीन प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित आराखड्यांतर्गत, पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यातून एटीएम (ATM) कार्डद्वारे पैसे काढण्याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. ही सुविधा अत्यंत सोयीस्कर वाटत असली, तरी विशेषतः निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, जर एखाद्या कर्मचाऱ्याने 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढली, तर त्याच्या पेन्शनवर (EPS) याचा काय परिणाम होईल?
EPF आणि EPS मधील मूलभूत फरक
अनेक कर्मचाऱ्यांना असे वाटते की ईपीएफ (EPF) आणि ईपीएस (EPS) हे एकच आहेत, परंतु नियमानुसार हे दोन स्वतंत्र विभाग आहेत. एटीएममधून पैसे काढण्याची प्रस्तावित सुविधा फक्त ‘ईपीएफ कॉर्पस’वर लागू असेल. यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता (कंपनी) दोघांचे योगदान समाविष्ट असते. यातून जास्तीत जास्त 75% रक्कम काढण्याची मर्यादा असेल. मात्र, पेन्शन फंड म्हणजेच ‘ईपीएस’ ही रक्कम पूर्णपणे वेगळी आणि सुरक्षित ठेवली जाते. एटीएम सुविधेद्वारे पेन्शन फंडातील पैसे काढता येणार नाहीत.
हेही वाचा – सॅम बिलिंग्स आणि मोहम्मद रिझवानचा ‘तो’ व्हायरल व्हिडिओ; ड्रेसिंग रूममध्ये नक्की काय घडलं?
पेन्शनची पात्रता कशी ठरते?
पेन्शन मिळवण्यासाठी तुमच्या पीएफ खात्यात किती शिल्लक आहे, यापेक्षा तुमची एकूण सेवा कालावधी (Service Period) किती आहे, हे महत्त्वाचे असते. कोअर इंटेग्रा (Core Integra) चे तज्ज्ञ मुनाब अली बॅक यांच्या मते, प्रोव्हिडंट फंडातून (PF) काही प्रमाणात रक्कम काढल्यामुळे कर्मचाऱ्याचा सेवा कालावधी किंवा पेन्शन फंडातील योगदानावर कोणताही परिणाम होत नाही.
जर एखादा कर्मचारी 50 वर्षांचा असेल आणि त्याने आपल्या पीएफ खात्यातून मोठी रक्कम काढली, तरी त्याचा ‘सर्व्हिस रेकॉर्ड’ रिसेट होत नाही. जोपर्यंत कर्मचारी किमान 10 वर्षांची पात्रता सेवा पूर्ण करतो, तोपर्यंत तो पेन्शन मिळवण्यास पात्र राहतो.
नोकरी सोडल्यानंतरचे नियम
जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडली असेल, तर पेन्शन योजनेतील रकमेवर दावा करण्यासाठी त्याला 36 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते. याशिवाय, वयाची 55 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पेन्शन फंडातून पैसे काढण्याची परवानगी दिली जाते. पेन्शन फंडातून पैसे काढण्यासाठी 36 महिन्यांचा ब्रेक, 58 वर्षे वय पूर्ण होणे किंवा कायमस्वरूपी अपंगत्व यांसारख्या अटींची पूर्तता होणे आवश्यक असते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा