

IPL 2024 KKR vs LSG : आजचा आयपीएल सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. ईडन गार्डन्सवर रंगणाऱ्या या सामन्यात कोलकाताना कप्तान श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज शमार जोसेफचे लखनऊ संघात स्वागत झाले आहे. हर्षित राणा केकेआर संघात परतला आहे. दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने यंदा चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी पहिले तीन सामने जिंकले पण चौथ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघ 6 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सने पाच सामने खेळले आहेत आणि तीन जिंकले आहेत, त्यांना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनऊचा संघ 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
दोन्ही संघांची Playing 11
कोलकाता नाइट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कप्तान), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शामर जोसेफ, यश ठाकूर.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा