IPL 2024 KKR vs SRH : आंद्रे रसेलची तुफानी खेळी! 102 मीटरचा षटकार, हैदराबादला 209 धावांचे आव्हान

WhatsApp Group

IPL 2024 KKR vs SRH | आयपीएल 2024 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि हैदराबाद ईडन गार्डन्सवर आमनेसामने आहेत. सलामीवीर फिल सॉल्ट आणि आंद्रे रसेलच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर कोलकाता हैदराबादला 209 धावांचे आव्हान दिले आहे. संघाचे 4 फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर फिल सॉल्ट आणि त्यानंतर आंद्रे रसेलने जबरदस्त फलंदाजी केली. रसेलने आपल्या वादळी खेळीत 7 षटकार ठोकले.

केकेआरचा डाव

केकेआरकडून सुनील नरिन आणि फिल सॉल्ट यांनी ओपनिंग केली. नरिनला जास्त काही करता आले नाही. पण सॉल्टने जबरदस्त फलंदाजी केली. वेंकटेश अय्यर (2), कप्तान श्रेयस अय्यर (0) आणि नितीश राणा (9) यांना हैदराबादने स्वस्तात माघारी पाठवले. नवा कॅप्टन पॅट कमिन्सने अचूक रणनिती आखत केकेआरची अवस्था 4 बाद 51 अशी केली. त्यानंतर रमनदीप सिंगने सॉल्टला सोबत दिली. सॉल्टने 3 चौकार आणि 3 षटकारांसह 54 धावा केल्या. तर रमनदीपने 1 चौकार आणि 4 षटकारांसह 35 धावा केल्या. कमिन्सने रमनदीपला बाद केले. त्यानंतर ईडन गार्डन्सवर आंद्रे रसेलचे वादळ घोंगावले. त्याने 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. रसेलची चौफेर फटकेबाजी केली. मार्कंडेच्या एका षटकात रसेलने 3 षटकार ठोकले, ज्यात 102 मीटर षटकाराचा समावेश होता. रसेलमुळे केकेआरने दोनशेचा टप्पा ओलांडला. 20व्या षटकात रिंकू सिंह बाद झाला. त्याने 23 धावांचे योगदान दिले. रसेलने 25 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 64 धावा केल्या. कोलकाताने 20 षटकात 7 बाद 208 धावा केल्या. हैदराबादकडून टी. नटराजनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – IPL 2024 PBKS Vs DC : पंजाब किंग्जची दणक्यात सुरुवात, दिल्लीचा 4 गडी राखून पराभव!

दोन्ही संघांची Playing 11

सनरायझर्स हैदराबाद – मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी. नटराजन.

कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरिन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment