IPL 2024 LSG vs DC : दिल्लीचा लखनऊवर ऐतिहासिक विजय! डेब्यु मॅचमध्ये हिरो ठरला जेक फ्रेझर-मॅकगर्क

WhatsApp Group

IPL 2024 LSG vs DC : आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा सहा विकेट्सने पराभव केला. लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्लीला विजयासाठी 168 धावांचे लक्ष्य होते, जे दिल्लीने 19 व्या षटकात पूर्ण केले. आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सवर दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी दिल्लीला लखनऊविरुद्ध सलग तीन सामने हरले होते.

जेक फ्रेझर-मॅकगर्क दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा नायक ठरला. जेकने आपला पहिला आयपीएल सामना खेळताना 35 चेंडूत 55 धावांची खेळी खेळली, ज्यात पाच षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. कप्तान ऋषभ पंतने 41 धावांची खेळी केली. सलामीला आलेल्या पृथ्वी शॉने 32 धावांचे योगदान दिले.

हेही वाचा – IPL 2024 : स्वत:ची चूक असतानाही ऋषभ पंतचा अंपायरशी वाद..! विचित्र प्रकार कॅमेऱ्यात कैद

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर लखनऊच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना सात विकेट गमावत 167 धावा केल्या. लखनऊकडून आयुष बडोनीने 55 धावांची नाबाद खेळी खेळली. आयुषने 35 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार ठोकला. आयुषने अर्शद खान (20*) सोबत आठव्या विकेटसाठी 73 धावांची नाबाद भागीदारी केली, ज्यामुळे लखनऊला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. एकवेळ लखनौने 94 धावांवर सात विकेट गमावल्या होत्या. कर्णधार केएल राहुलनेही 39 धावांचे तर क्विंटन डी कॉकने 19 धावांचे उपयुक्त योगदान दिले. दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा आणि खलील अहमद यांना प्रत्येकी दोन बळी मिळाले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment