

IPL 2024 LSG vs PBKS : आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगत आहे. लखनऊमध्ये रंगणाऱ्या या सामन्यात लखनऊने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टॉसवेळी लखनऊकडून निकोलस पूरन मैदानात आला. केएल राहुल इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार असल्याचे त्याने सांगितले.
21 वर्षाचा मयंक यादव लखनऊकडून पदार्पणाचा सामना खेळत आहे. लखनऊ पहिल्या विजयाची वाट पाहत आहे, तर पंजाबने दोनपैकी एक सामना जिंकला आहे आणि एक गमावला आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये जेव्हा दोन्ही संघ शेवटचे आमने सामने आले तेव्हा लखनऊने 20 षटकांत 257 धावा केल्या होत्या आणि हा सामना लखनऊने 56 धावांनी जिंकला होता.
हेही वाचा – टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा ‘या’ वेळेला होणार!
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन (कप्तान), मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ.
पंजाब किंग्ज – शिखर धवन (कप्तान), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा