

IPL 2024 PBKS vs MI : मुल्लानपूरमध्ये रंगलेल्या रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जला 9 धावांनी पराभूत केले आहे. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या पंजाबसमोर मुंबईने 192 धावा केल्या प्रत्युत्तरात पंजाबने शेवटपर्यंत झुंज दिली. आशुतोष शर्माने 7 षटकारांसह 61 धावांची खेळी केली, पण तो 18व्या षटकात बाद झाला आणि पंजाबच्या आशा संपुष्टात आल्या. पंजाबला 183 धावांपर्यंत पोहोचता आले.
सूर्यकुमार यादवच्या 78 धावांच्या जोरावर मुंबई संघाने 20 षटकात 7 बाद 192 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 36 धावांची खेळी केली. यात त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. रोहितशिवाय तिलक वर्माने 2 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 34 धावा केल्या. पंजाबकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर सॅम करनला 2 विकेट्स मिळाल्या.
हेही वाचा – WHAT. A. BALL! जसप्रीत बुमराहचा जबरदस्त यॉर्कर; पंजाबच्या बॅटरचे स्टम्प्स उद्ध्वस्त! पाहा Video
प्रत्युत्तरात पंजाबची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात पंजाबला दोन हादरे दिले. 49 धावांत 5 बाद अशी अवस्था असताना शशाकं सिंगने 25 चेंडूत 41 धावांची खेळी केली. 13व्या षटकात बुमराहने शशांकचा अडथळा दूर केला. त्यानंतर मुंबईला आशुतोष शर्माने हैराण केले. जेराल्ड कोएत्झीने त्याला बाद करत सामना मुंबईच्या बाजुला झुकवला. शेवटच्या षटकात पंजाबला 12 धावांची गरज असताना मुंबईकडून आकाश मधवालने दोनच धावा दिल्या. कगिसो रबाडा धावबाद झाला आणि पंजाबचा डाव 19.1 षटकात 183 धावांवर संपुष्टात आला.
दोन्ही संघांची Playing 11
पंजाब किंग्ज : रायली रुसो, प्रभसिमरन सिंग, सॅम रन (कप्तान), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा