IPL 2024 PBKS vs MI : पंजाबचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय! शिखर धवन, जॉनी बेअरस्टो बाहेर; पाहा Playing 11

WhatsApp Group

IPL 2024 PBKS vs MI : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळला जात आहे. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात पंजाबचा कप्तान सॅम करनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या संघात मोठे बदल झाले आहेत.

सध्या पॉइंट टेबलमध्ये पंजाब आणि मुंबई जवळपास बरोबरीवर आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यापैकी 2 जिंकले असून 4 पराभव पत्करले आहेत. पंजाबचा संघ 8व्या तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ 9व्या स्थानावर आहे.

हेही वाचा – EPFO Rule Change : आता तुम्ही काढू शकता 1 लाख रुपये; पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा!

मात्र शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तो अजून बरा झालेला नाही. अशा स्थितीत त्याच्या जागी सॅम करन कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. गब्बरच्या अनुपस्थितीत पंजाब संघाला विजयासाठी पूर्ण प्रयत्न करावे लागतील. सध्या पंजाब संघात करण व्यतिरिक्त शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.

दोन्ही संघांची Playing 11

पंजाब किंग्ज : रायली रुसो, प्रभसिमरन सिंग, सॅम रन (कप्तान), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment