IPL 2024 : राजस्थान रॉयल्सचा स्पर्धेतील पाचवा विजय, पंजाबला त्यांच्यात मैदानात हरवलं!

WhatsApp Group

IPL 2024 PBKS vs RR : मुल्लानपूरमध्ये रंगलेल्या आयपीएलच्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जवर 3 गडी राखून विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने राजस्थान रॉ़यल्सला 148 धावांचे आव्हान दिले होते. पंजाबकडून आशुतोष शर्माने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने 39 धावा केल्या. त्यानंतर तनुष कोटियनने 24 धावा, रियान परागने 23 धावा, शिमरॉन हेटमायरने नाबाद 27 धावा केल्या. पंजाबकडून कगिसो रबाडा आणि सॅम करन यांनी 2-2 विकेट्स घेतल्या.

शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 10 धावांची गरज होती. पंजाबकडून अर्शदीप सिंगने पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले. त्यानंतर शिमरोन हेटमायरने त्याला दोन षटकार लगावत राजस्थानला विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सचा सहा सामन्यांमधला हा पाचवा विजय असून गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्जचा सहा सामन्यांतील हा चौथा पराभव ठरला.

पंजाबच्या कशाबशा 147 धावा…

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने आठ गडी गमावून 147 धावा केल्या. पंजाबसाठी इम्पॅक्ट खेळाडू आशुतोष शर्माने 16 चेंडूत 31 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान आशुतोष शर्माने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. तर जितेश शर्माने 29 धावांची तर लियाम लिव्हिंगस्टोनने 21 धावांची खेळी केली. बाकीचे फलंदाज काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. राजस्थान रॉयल्सकडून केशव महाराज आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर कुलदीप सेन, युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment