

IPL 2024 PBKS vs SRH : आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज (PBKS) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना खेळला जात आहे. हा सामना मल्लनपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने पंजाबसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले.
या सामन्यात हैदराबाद संघाची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी केवळ 39 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर नितीश कुमार रेड्डीने 32 चेंडूत अर्धशतक करत संघाची धुरा सांभाळली. त्याने 37 चेंडूत 64 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. नितीशने 4 चौकार आणि 5 षटकार ठोकले. तर अब्दुल समदने 12 चेंडूत 25 धावा केल्या.
नितीश आणि अब्दुल यांनी सहाव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली आणि संघाला 9 विकेट्सवर 182 धावांपर्यंत पोहोचवले. पण या सगळ्यात पंजाब संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. त्याने 29 धावांत सर्वाधिक 4 बळी घेतले. हर्षल पटेल आणि सॅम करनने 2-2 विकेट घेतल्या. तर कगिसो रबाडाला 1 विकेट मिळाली.
हेही वाचा – महाराष्ट्रात एनडीएला मनसेचा पाठिंबा, राज ठाकरेंची ‘मोठी’ घोषणा!
दोन्ही संघांची Playing 11
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम करन, सिकंदर रझा, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि कगिसो रबाडा.
इम्पॅक्ट सब : प्रभसिमरन सिंग, नॅथन एलिस, तनय थियागराजन, राहुल चहर, ऋषी धवन.
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, शाहबाज अहमद, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट.
इम्पॅक्ट सब : उमरान मलिक, मयंक मार्कंडे, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा