IPL 2024 RR vs DC : शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला गुंडाळलं, राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय!

WhatsApp Group

IPL 2024 RR vs DC | राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी मात देत सलग दुसरा विजय नोंदवला. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. राजस्थानकडून आवेश खानने तिखट मारा करत फक्त 4 धावा दिल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. रियान परागच्या नाबाद 84 धावांच्या जोरावर राजस्थानने 20 षटकात 5 बाद 185 धावा केल्या. हे आव्हान दिल्लीला पेलवले नाही. त्यांच्याकडून डेव्हिड वॉर्नरने 49 तर ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 44 धावांची खेळी केली. पण ती अपूर्ण ठरली. ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव आहे.

राजस्थानकडून नांद्रे बर्गर आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन बळी घेत सामन्यात दबाव निर्माण केला. ऋषभ पंतही 26 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. तत्पूर्वी राजस्थानच्या डावात रियानव्यतिरिक्त रवीचंद्रन अश्विनने 3 षटकारांसह 29 धावांची खेळी केली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल (5), जोस बटलर (11) आणि संजू सॅमसन (15) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.

हेही वाचा – ONGC Recruitment 2024 : सरकारी नोकरीची संधी, पगार 68 हजार रुपये, ‘असा’ करा अर्ज!

दोन्ही संघांची Playing 11

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कप्तान/विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान.

दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (कप्तान/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, खलील अहमद, मुकेश कुमार.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment