IPL 2024 : रियान परागची आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी, दिल्लीला 186 धावांचे आव्हान

WhatsApp Group

IPL 2024 RR vs DC Riyan Parag | सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रियान परागने यंदा आयपीएलमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. राजस्थानच्या दुसऱ्या सामन्यातील जबरदस्त फलंदाजीमुळे रियानने टीकाकारांची तोंडे बंद करून टाकली. आयपीएल 2024 साठी राजस्थान रॉयल्सने रियान परागला नवीन भूमिका दिलीय. कर्णधार संजू सॅमसनने सामन्यात आधीच सांगितले होते की रियान पराग चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे.

पहिल्या सामन्यातही तो याच क्रमांकावर खेळायला आला आणि दमदार खेळी खेळण्यात यशस्वी ठरला. दुसऱ्या सामन्यात त्याने आपली भूमिका चोख बजावली आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले. एवढेच नाही तर त्याने आयपीएलमधील कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळीही खेळली. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रियानने 7 चौकार आणि 6 षटकारांसह 84 धावा केल्या. दिल्लीचा तेजतर्रार गोलंदाज एनरिक नॉर्कियाने टाकलेल्या 20व्या षटकात रियानने 25 धावा कुटल्या. यात तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

हेही वाचा – अक्षय्य तृतीयापर्यंत सोने बनवणार रेकॉर्ड! 10 ग्रॅमची किंमत राहणार ‘इतकी’

रियानच्या कामगिरीच्या जोरावर राजस्थानने दिल्लीला 186 धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने 20 षटकात 5 गडी गमावून 185 धावा केल्या. रियानव्यतिरिक्त रवीचंद्रन अश्विनने 3 षटकारांसह 29 धावांची खेळी केली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल (5), जोस बटलर (11) आणि संजू सॅमसन (15) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.

दोन्ही संघांची Playing 11

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कप्तान/विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान.

दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (कप्तान/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, खलील अहमद, मुकेश कुमार.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment