

IPL 2024 RR vs DC | राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना आज म्हणजेच गुरुवार 28 मार्च रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगत आहे. राजस्थान रॉयल्सने मोसमाची सुरुवात विजयाने केली, तर दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कप्तान ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली.
राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 20 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्जविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सला 4 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. 453 दिवसांनंतर पुनरागमन करताना ऋषभ पंत चमत्कार करू शकला नाही आणि 13 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. या सामन्यात त्याच्याकडून कर्णधारपदाच्या खेळीची अपेक्षा असेल. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने रॉयल्सच्या हंगामातील पहिल्या सामन्यात सलग पाचव्यांदा अर्धशतक झळकावले होते.
दोन्ही संघांची Playing 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कप्तान/विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान.
दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (कप्तान/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, खलील अहमद, मुकेश कुमार.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा