

IPL 2024 RR vs GT : जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. चहल आपला 150 वा सामना खेळत आहे तर संजू सॅमसन कर्णधार म्हणून 50 वा आयपीएल सामना खेळत आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कप्तान शुबमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रियान पराग, संजू सॅमसनच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने 20 षटकात 3 बाद 193 धावा रचल्या.
रियान परागने 3 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांसह 76, संजू सॅमसनने 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 68 धावांची खेळी केली. या सामन्यात गुजरातच्या खेळाडूंनी चौकार सोडले.
हेही वाचा – महाराष्ट्रात गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
दोन्ही संघांची Playing 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कप्तान), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स – शुबमन गिल (कप्तान), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मोहित शर्मा.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा