

IPL 2024 SRH vs CSK : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादशी पाचवेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) आज सामना होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएल 2024 हंगामातील 18 वा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघांना त्यांच्या मागील सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे सीएसके आणि हैदराबाद विजयी ट्रॅकवर परत येण्याकडे लक्ष देतील. या सामन्यात हैदराबादचा कप्तान पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथं गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपल्या Playing 11 मध्ये बदल केले आहेत.
या सामन्यासाठी हैदराबादने संघात दोन बदल केले आहेत, तर सीएसकेने तीन बदल केले आहेत. हैदराबाद संघात मयंक अग्रवालच्या जागी नितीश रेड्डीला स्थान मिळाले आहे, तर नटराजनचे संघात पुनरागमन झाले आहे. सीएसकेचा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना आजारी असल्याने तो या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. या सामन्यासाठी सीएसकेने मोईन अली, महिश थिक्षणा आणि मुकेश चौधरी यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.
हेही वाचा – Byju’s चे संस्थापक बायजू रवींद्रन यांची संपत्ती शून्य, एका वर्षापूर्वी होती 17,545 कोटी रुपये!
दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्श हैदराबाद – अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कप्तान), जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी. नटराजन.
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महिश थिक्षना.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा