

IPL 2025 Auction : इंडियन प्रीमियर लीगच्या 2025 हंगामासाठी मेगा लिलावाचा आज अंतिम दिवस होता. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे सुरू असलेल्या या लिलावात इंग्लंडचा टॉप ऑर्डर स्फोटक फलंदाज विल जॅक्सला मुंबई इंडियन्सने विकत घेतले. आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने केवळ 41 चेंडूत शतक झळकावून आरसीबीसाठी खळबळ उडवून दिली होती. विल जॅक्सला विकत घेण्यासाठी मुंबईने 5.25 कोटींची मोठी बोली लावली, ज्याची मूळ किंमत 2 कोटी होती, पण आरसीबीने त्याचे राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरले नाही.
मुंबई इंडियन्सला विल जॅक्ससारख्या स्फोटक फलंदाजाची कोणत्याही किंमतीत गरज होती, परंतु सर्वांच्या नजरा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर होत्या, परंतु आरसीबीने त्यांचे आरटीएम कार्ड न वापरून सर्वांना आश्चर्यचकित केले. खुद्द मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी देखील आश्चर्यचकित झाले होते, त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आपल्या टेबलावरून उठून आकाश अंबानी आरसीबीच्या टेबलाजवळ पोहोचले आणि तिथे बसलेल्या मॅनेजमेंट लोकांशी हस्तांदोलन करून आभार मानले.
BIGGEST MOMENT OF THE DAY.
— Johns. (@CricCrazyJohns) November 25, 2024
– Akash Ambani hugging with RCB management as they decide not to use RTM for Will Jacks. pic.twitter.com/S4nEbwn3j8
हेही वाचा – Mumbai Local : मुंबईच्या सर्व लोकल गाड्यांचे एसी गाड्यांमध्ये रूपांतर होणार!
गुजरात टायटन्ससमोर 201 धावांच्या भक्कम लक्ष्याचा पाठलाग करताना विल जॅक्सने 10 षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने स्फोटक शतक झळकावले होते. आपल्या विध्वंसक खेळीदरम्यान, त्याने अनुभवी अफगाण फिरकी गोलंदाज राशिद खानला एकाच षटकात चार षटकारांसह 28 धावा ठोकल्या. जॅक्सने विराट कोहलीसोबत अविश्वसनीय नाबाद 166 धावांची भागीदारी केली, जी गेल्या मोसमातील सर्वात अविस्मरणीय भागीदारांपैकी एक होती. प्लेऑफसाठी अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात आरसीबीने चार षटके आधीच सामना खिशात टाकला होता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!