

IPL 2025 Auction : इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामापूर्वी मेगा लिलावात फ्रेंचायझींनी खेळाडूंवर भरपूर पैसा खर्च केला. ऋषभ पंत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या 27 कोटी रुपयांमधून किती पैसे मिळणार, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होत असेल. ऋषभ पंतला कर म्हणून किती रक्कम भरावी लागेल आणि स्पर्धेदरम्यान किंवा त्यापूर्वी दुखापत झाल्यास त्याचे काय नुकसान होईल?
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने नव्या सत्रात दिल्ली कॅपिटल्स संघ सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयापासून मेगा लिलावात त्यासाठीची बोली लावण्यात आली होती. 30 कोटी रुपयांपर्यंतची बोली अपेक्षित होती. लखनऊच्या टीमने त्याच्यासाठी 27 कोटी मोजले.
ऋषभ पंतला किती पैसे मिळतील?
इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या लिलावात खेळाडूंची बोली लावण्यात आली आणि संघासोबत तीन वर्षांचा करार करण्यात आला. फ्रेंचायझीने बोली लावून खेळाडूंना खरेदी केलेली रक्कम त्यांना एका हंगामासाठी द्यावी लागेल. लखनऊने ऋषभ पंतला 27 कोटी रुपयांना विकत घेतले पण त्याला हे सगळे पैसे एका मोसमात मिळणार नाहीत. यापैकी भारत सरकार 8.1 कोटी रुपये कर जमा करणार आहे. त्याला आयपीएल संघाकडून 18.9 कोटी रुपये मानधन मिळणार आहे.
हेही वाचा – IPL 2025 Auction : ‘या’ खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सच्या मालकाने RCB चे मानले आभार!
ऋषभ पंतला आयपीएलदरम्यान दुखापत झाल्यास त्याला संपूर्ण रक्कम मिळेल, परंतु त्यापूर्वी तो दुखापतग्रस्त झाला आणि स्पर्धेत खेळू शकला नाही, तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा समावेश करण्याचा अधिकार फ्रेंचायझीला असेल. स्पर्धेपूर्वी एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास परदेशी खेळाडूंना पैसे मिळत नाहीत. टीम इंडियाकडून खेळताना एखादा भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त झाला आणि आयपीएल खेळू शकला नाही, तर बीसीसीआयने त्याचा विमा काढला आहे, त्यामुळे त्याला संपूर्ण हंगामासाठी पैसे मिळतात.
जर एखादा भारतीय किंवा परदेशी खेळाडू आयपीएल फ्रेंचायझी संघासोबत संपूर्ण स्पर्धा खेळण्यासाठी उपलब्ध असेल परंतु त्याला एकही सामना खेळायला मिळत नसेल. अशा स्थितीत संघाने खेळाडूसाठी जेवढे पैसे मोजले आहेत ते सर्व मॅच न खेळता दिले जातील. वैयक्तिक कारणांमुळे एखाद्या खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतल्यास, खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या संख्येनुसार पैसे दिले जातील. स्पर्धेच्या मध्यावर जरी तो दुखापतग्रस्त झाला तरी त्याची संपूर्ण रक्कम संघाला द्यावी लागेल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!