संपलं सगळं..! जसप्रीत बुमराह टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर; भारताला ‘मोठा’ धक्का!

WhatsApp Group

Jasprit Bumrah out of T20 World Cup : ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया मालिकेतच पुनरागमन केले, त्याआधी तो दुखापतीमुळे बाहेर गेला होता. मात्र पुनरागमनानंतर तो केवळ दोनच सामने खेळू शकला, तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो प्लेइंग-११ मध्ये दिसला नाही. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया कप-२०२२ मध्ये भाग घेऊ शकला नाही आणि भारतीय संघ सुपर-४ टप्प्यातूनच बाहेर पडला.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराहची दुखापत गंभीर असून तो सुमारे ४ ते ६ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो. बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने जसप्रीत बुमराहच्या टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्याची पुष्टी केली आहे.

हेही वाचा – सावधान..! कोणीतरी सांगितलं म्हणून उगाच गरम पाणी पिऊ नका; ‘हे’ तोटे होतील!

पाठीच्या समस्येमुळे जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला टी-२० सामनाही खेळू शकला नाही. पण आता असे सांगण्यात येत आहे की ही समस्या अधिक गंभीर आहे आणि फ्रॅक्चर सारखी असू शकते.

टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

Leave a comment