जसप्रीत बुमराह टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार? मोहम्मद कैफचा ‘तो’ VIDEO चर्चेत!

WhatsApp Group

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Test Retirement : भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या मॅंचेस्टर टेस्टदरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, असा दावा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने केला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या टेस्ट सामन्याचे तीन दिवस पूर्ण झाले असून इंग्लंडने या सामन्यावर पकड मिळवलेली आहे. मात्र, चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला मोहम्मद कैफच्या एका विधानाने क्रिकेट विश्वात खळबळ उडवली आहे.

बुमराह टेस्टमधून संन्यास घेणार

कैफ म्हणाला, “माझ्या मते जसप्रीत बुमराह पुढचा टेस्ट सामना खेळणार नाही. कदाचित तो टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर करू शकतो. त्याचे शरीर आता साथ देत नाहीये. मॅंचेस्टरमधील सामन्यात त्याच्या वेगातही घट झाली आहे. तो अत्यंत प्रामाणिक खेळाडू आहे, आणि जर त्याला वाटलं की देशासाठी तो 100% देऊ शकत नाही, तर तो टेस्टमधून निवृत्त होईल. बुमराहची कामगिरी कोणालाही नाकारता येणार नाही. पण या सामन्यात त्याच्या शरीराची मर्यादा स्पष्ट दिसून आली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि अश्विननंतर बुमराहही टेस्ट क्रिकेटमधून बाहेर पडेल आणि आपल्याला त्याशिवाय खेळ पाहण्याची सवय लावावी लागेल.”

हेही वाचा – हे खरंच घडलंय! चिमुकल्याने विषारी सापाला दातांनी मारलं, डॉक्टरही म्हणाले, “अविश्वसनीय!”

बुमराहची कामगिरी फिक्की

मॅंचेस्टर टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहला आतापर्यंत केवळ एकच विकेट मिळाली आहे. सुरुवातीच्या 20 षटकांत तो एकही बळी घेऊ शकला नाही. एकूण 28 षटकांत त्याने 95 धावा दिल्या असून तिसऱ्या सत्रात त्याने जैमी स्मिथचा एकमेव बळी घेतला. याशिवाय तो संपूर्ण सामन्यात प्रभावी वाटला नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment