

T20 World Cup 2022 : यूएईचा २२ वर्षीय लेग स्पिन गोलंदाज कार्तिक मयपनने टी-२० विश्वचषक २०२२ची पहिली हॅट्ट्रिक घेतली. अ गटातील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला. कार्तिकने श्रीलंकेच्या डावाच्या १५व्या षटकात ही कामगिरी केली. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील ही पाचवी हॅट्ट्रिक आहे. २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने टी-२० विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक घेतली होती.
श्रीलंकेच्या डावातील १५व्या षटकातील चौथ्या चेंडूवर कार्तिकने भानुका राजपक्षेला काशिफ दाऊदकरवी झेलबाद केले. मयपनचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. यावर मोठा फटका खेळण्याच्या प्रक्रियेत राजपक्षे डीप कव्हरमध्ये झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर मयपनने चरित असलंकाला आपला बळी बनवले. पुढच्या चेंडूवर मयपनला हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी होती आणि त्याने ती वाया जाऊ दिली नाही. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका स्ट्राईकवर होता. मयपनचा हा चेंडूही गुगली होता, शनाका क्लीन बोल्ड झाला. त्याला खातेही उघडता आले नाही.
हेही वाचा – ‘सोमवार’ हा आठवड्यातील सर्वात वाईट दिवस, ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’कडून घोषणा
History – First hattrick in the T20 World Cup 2022. pic.twitter.com/AoLcKagK1i
— Johns. (@CricCrazyJohns) October 18, 2022
कार्तिक मयपनचा भारताशी खूप खोल संबंध आहे. त्यांचा जन्म चेन्नई येथे झाला. त्याने एकाच षटकात तिन्ही विकेट घेतल्या. कार्तिकने आपल्या ४ षटकांत १९ धावा दिल्या आणि एकवेळ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणाऱ्या श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.