तिकीट ₹11,800… पण दर्शन नाही! 20 मिनिटात गायब, मेस्सीच्या दौऱ्यावर चाहत्यांचा संताप!

WhatsApp Group

Lionel Messi Kolkata Tour : फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या बहुप्रतिक्षित भारतातील ‘GOAT Tour’ची सुरुवात कोलकात्यात मोठ्या अपेक्षांमध्ये झाली होती. मात्र ही अपेक्षा अवघ्या 20 मिनिटांत मातीमोल ठरली. शनिवारी कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये मेस्सीचा केवळ क्षणिक दर्शनाचा कार्यक्रम गोंधळात, संतापात आणि तोडफोडीत बदलला.

11.30 वाजता आगमन, 20 मिनिटांत निरोप

लिओनेल मेस्सी सकाळी साडेअकराच्या सुमारास कारने स्टेडियममध्ये दाखल झाला. मैदानात पाय ठेवताच त्याला सुरक्षेच्या मानवी भिंतीत वेढण्यात आले. चाहते, आयोजक, VIP, मंत्री, अधिकारी – सगळेच मैदानात उतरल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. वारंवार विनंती करूनही मैदान रिकामं न झाल्यामुळे, चाहत्यांकडे हात हलवत असलेला 2022 वर्ल्डकप विजेता मेस्सी मैदान सोडून बाहेर गेला.

तिकीटधारकांचा संताप अनावर

मेस्सी मैदानाबाहेर गेल्यानंतर स्टेडियममध्ये अभूतपूर्व गोंधळ उडाला. ₹3,800 ते ₹11,800 पर्यंत तिकीट काढून बसलेले हजारो चाहते संतप्त झाले. घोषणा, शिवीगाळ, हूटिंगनंतर काही चाहत्यांनी खुर्च्या, पाण्याच्या बाटल्या मैदानात फेकल्या, तर हजारो लोक थेट मैदानात घुसले.

मेस्सीसाठी लग्न सोडलं…

एका चाहत्याने सांगितले, “आज माझा लग्नाचा दिवस आहे, पण मेस्सीसाठी मी सर्व समारंभ सोडून इथे आलो. तरीही, व्यवस्थापन इतके सुमार होते की मी त्याला पाहूही शकलो नाही.”

“हा कार्यक्रम म्हणजे फसवणूक”  

“आम्ही फुटबॉलवर प्रेम करतो. मेस्सीसाठी पैसे, वेळ, भावना सगळं खर्च केलं. पण इथे सगळा खेळ VIP आणि मंत्र्यांसाठी होता. सामान्य चाहत्यांना काहीच दिसलं नाही. हा सरळसरळ स्कॅम आहे.” दुसऱ्या चाहत्याने सांगितले, “किमान 5 हजारांचं तिकीट होतं. पण मेस्सीभोवती VVIP लोकच होते. त्याने एक किकही मारली नाही. 10 मिनिटं आला आणि गेला.”

हेही वाचा – लिना मेडिना : जिनं लहानपणी आई होऊन जगाला गोंधळवून टाकलं!

70 फूट पुतळ्याचे उद्घाटन, पण मैदानात अपमान

या आधी मेस्सीने कोलकात्याच्या लेक टाउनमध्ये 70 फूट उंच पुतळ्याचे आभासी उद्घाटन केले होते. टीएमसी आमदार सुजीत बोस यांनी, “हा जगातील सर्वात उंच मेस्सीचा पुतळा आहे”
असं सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमात मेस्सी चाहत्यांना दर्शनही नीट झालं नाही.

शाहरुख खानही न आल्याने नाराजी

या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार शाहरुख खान येणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांची एन्ट्रीच झाली नाही. त्यामुळे आधीच संतप्त असलेले चाहते अधिकच चिडले.

 स्टेडियममध्ये तोडफोड, राजकीय आरोप

गोंधळ वाढल्यानंतर स्टेडियमच्या काही भागांची तोडफोड झाली. भाजप नेते सुकांत मजूमदार यांनी टीएमसी सरकारवर गंभीर आरोप केले. “हा कार्यक्रम टीएमसीने हायजॅक केला. तिकीट महागात विकली, भ्रष्टाचार झाला.”

पुढील शहरांमध्ये काय होणार?

मेस्सीचा भारत दौरा अजून काही शहरांमध्ये होणार आहे. मात्र कोलकात्यातील गोंधळाने आयोजकांच्या क्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. फुटबॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या कोलकात्याच्या प्रतिमेला या घटनेने मोठा धक्का बसला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment