किती गोड..! महेंद्रसिंह धोनीच्या ‘त्या’ कृतीचं होतंय सर्वत्र कौतुक; VIDEO पाहिला का?

WhatsApp Group

महेंद्रसिंह धोनी त्याच्या कर्णधारपदासाठी, फलंदाजी आणि यष्टीरक्षणासाठी तसेच त्याच्या हुशार आणि चाणाक्ष उत्तरांसाठी ओळखला जातो. यासोबतच धोनीला त्याच्या विनम्र स्वभावामुळं चाहत्यांमध्ये प्रशंसा मिळते. धोनीचा सोशल मीडियावर आपल्या खास स्टाइलसाठी बोलबाला आहे. सध्या सोशल मीडियावर धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो विमानतळावर त्याच्या सभ्य वर्तनानं चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श करत आहे.

काय आहे हा व्हिडिओ?

महेंद्रसिंह धोनी रविवारी रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावरून चेन्नईला रवाना झाला होता. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी विमानतळावर चाहते आणि विमानतळ कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिसला. धोनीनं विमानतळावरील अधिकाऱ्यांचेही हस्तांदोलन करून स्वागत केलं. माहीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून धोनीच्या या सरळ आणि साध्या स्वभावाचे चाहते कौतुक करत आहेत.

हेही वाचा – VIDEO : दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर ऑस्ट्रेलियाच्या रुग्णालयात दाखल; म्हणाला, “ही माझी शेवटची…”

महेंद्रसिंह धोनीला ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होतं. धोनीचे चेन्नईशी खास संबंध आहेत. २००८ मध्ये, तो चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीचा कर्णधार बनला आणि तेव्हापासून त्यानं चेन्नईचा कर्णधार म्हणून चार आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत. मात्र, आयपीएलचा शेवटचा हंगाम त्याच्यासाठी खास राहिला नव्हता.

आयपीएलच्या १५व्या हंगामापूर्वी धोनीनं कर्णधारपद सोडले होतं आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाला चेन्नईचं कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र, चेन्नईचा कर्णधार म्हणून जडेजाचा कार्यकाळ निराशाजनक ठरला, कारण त्यानं आठ सामन्यांत आपल्या संघाचं नेतृत्व केल्यानंतर केवळ दोन सामने जिंकता आले. जडेजाला मधल्या हंगामात चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि धोनीनं पुन्हा संघाची धुरा सांभाळली. चेन्नईनं आयपीएल २०२२चा हंगाम १४ सामन्यांतून केवळ १० गुणांसह नवव्या स्थानावर संपवला.

धोनीची कारकीर्द

धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. पण असं असूनही, तो अजूनही आयपीएलमध्ये सक्रिय आहे. धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं ३५० एकदिवसीय सामने, ९० कसोटी सामने आणि ९८ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकूण २८८ सामन्यांमध्ये त्यानं कर्णधारपद भूषवलं आहे. त्याचवेळी चेन्नईकडून २३४ सामने खेळले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment