

Rohit Sharma Playing Holi 2024 | आज देशभरात होळी साजरी होत आहे. रंगांचा हा सण लहान मुले आणि वृद्ध सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. देशभरातून होळीचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्माही होळी खेळण्यात मागे राहिलेला नाही. रोहितने त्याचा होळी खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. 37 वर्षांचा रोहित होळी खेळत आहे, जसे 10-15 वर्षांचे मूल. रोहितने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.
पत्नी रितिका आणि मुलीसोबत रोहितची मस्ती
रोहित शर्माने पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत होळी खेळली. रोहितसोबत त्याचे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघातील काही सहकारीही तिथे होते. रोहितने एक स्लाईडही मारी. रंगात मग्न असलेला रोहित जोमाने नाचला. रोहितने व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या कॅमेरामनला पाण्याने भिजवले. मुंबई इंडियन्सने त्याचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केला आहे.
हेही वाचा – IPL 2024 Full Schedule : आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर, फायनल ‘या’ दिवशी..! पाहा
पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव
रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावला होता. नवीन कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने आयपीएल 2024 मध्ये होलिका दहनाच्या दिवशी गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना गमावला. रोहितच्या बॅटमधून धावा आल्या पण तरीही मुंबईचा संघ सामना हरला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई एके काळी विजयाच्या जवळ जाताना दिसत होती. पण अखेर गुजरातने हा सामना 6 धावांनी जिंकला. आता मुंबईचा पुढचा सामना 27 मार्चला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा