RCB विकली जाणार, IPL 2026 लिलावाआधी ललित मोदींचा मोठा गौप्यस्फोट!

WhatsApp Group

RCB Sale : IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी असा दावा केला आहे की RCB संघ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे आणि यासाठी जागतिक गुंतवणूकदारांनीही रस दाखवलेला आहे.

ललित मोदींचा ‘बॉम्बशेल’ ट्विट

29 सप्टेंबर रोजी ललित मोदी यांनी सोशल मीडियावर ट्विट करत RCB विक्रीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी म्हटले की, “@RCBTweets संघाबाबत विक्रीच्या अफवा अनेक वर्षांपासून ऐकल्या जात होत्या, पण यावेळी मालकांनी अखेर निर्णय घेतल्याचे दिसते आहे.” ते पुढे म्हणाले, “IPL जिंकल्यानंतर, मजबूत चाहतावर्ग, उत्कृष्ट व्यवस्थापन टीम आणि संघाची ब्रँड व्हॅल्यू पाहता, ही एकमेव फ्रेंचायझी असू शकते जी पूर्णपणे विक्रीस उपलब्ध असेल.”

जागतिक गुंतवणूकदार तयार?

ललित मोदींच्या म्हणण्यानुसार, Citibank कडून ही विक्री प्रक्रिया हाताळली जाणार असून अनेक जागतिक फंड्स आणि sovereign गुंतवणूक फंड्स RCB खरेदीसाठी इच्छुक आहेत. “भारतासोबतच IPL चा भाग होण्याची ही सुवर्णसंधी आहे,” असंही मोदींनी नमूद केलं.

RCB चे यश आणि चाहत्यांचा भावनिक संबंध

2025 मध्ये आपल्या इतिहासातील पहिलं IPL विजेतेपद पटकावणाऱ्या RCB चा चाहतावर्ग अतिशय प्रबळ आणि भावनिक आहे. विराट कोहली, ए.बी. डिव्हिलियर्ससारख्या दिग्गजांमुळे RCB ची सोशल मीडियावरही मोठी उपस्थिती आहे. त्यामुळे या संघाच्या विक्रीची बातमी चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरू शकते.

हेही वाचा – Video : वैज्ञानिकांनी बनवलेलं चमत्कारी कृत्रिम हृदय, 8 दिवस जिवंत राहिला रुग्ण!

विक्रीने ठरणार ‘नवीन बेस प्राइस’?

ललित मोदींच्या मते, RCB ची विक्री ही आयपीएलमधील सर्व फ्रँचायझीसाठी एक नवीन बेस प्राइस ठरवेल. “ही डील आयपीएलच्या ग्लोबल वैल्यूला नव्याने अधोरेखित करेल,” असंही त्यांनी म्हटलं.

विजयाचा उत्सव – 11 जणांचा बळी

2025 मध्ये चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या विजय सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाल्याचीही घटना अजूनही चाहत्यांच्या मनात ताजी आहे. अशा पार्श्वभूमीवर संघाची विक्री हा अनेकांसाठी भावनिक मुद्दा ठरू शकतो.

अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

दरम्यान, RCB च्या मालक कंपनी United Spirits ने या बातम्यांचे खंडन केलं असून विक्रीसंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र ललित मोदींच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment