BREAKING : रॉजर बिन्नी BCCI चे नवे अध्यक्ष..! गांगुली आता ‘इथं’ जाणार?

WhatsApp Group

Roger Binny New President of BCCI : भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपले स्थान गमावले आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिन्नी यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिन्नी लवकरच पदभार स्वीकारतील, तर सौरव गांगुली आता पुन्हा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल म्हणजेच CAB चा अध्यक्ष होऊ शकतो.

१९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची मंगळवारी मुंबईत झालेल्या BCCI च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मंडळाचे ३६वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सौरव गांगुलीचा कार्यकाळ संपला आहे. गेली तीन वर्षे तो मंडळाच्या अध्यक्षपदावर विराजमान होता. त्याचबरोबर या एजीएममध्ये जय शहा यांना पुन्हा सचिवपद मिळण्याची दाट शक्यता असल्याने भावी पदाधिकारी बिनविरोध निवडून येण्याची खात्री आहे.

हेही वाचा –  मुंबईतील जपान दूतावासातील शिष्टमंडळाने घेतली CM एकनाथ शिंदेंची भेट

या बैठकीत आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरही चर्चा होणार आहे. सौरव गांगुलीला आयसीसीच्या सर्वोच्च पदावर बढती मिळू शकते, असे मानले जात आहे. जर सौरव गांगुली यासाठी तयार नसेल तर भारतीय क्रिकेट बोर्ड पुन्हा ग्रेग बार्कले यांना पाठिंबा देऊ शकते. आयसीसीच्या सर्वोच्च पदासाठी नामांकनाची अंतिम तारीख २० ऑक्टोबर आहे. आयसीसी बोर्डाची पुढील बैठक ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान मेलबर्न येथे होणार आहे.

Leave a comment