Photos : ऋतुराज गायकवाड चढला बोहल्यावर…! पवारांच्या लेकीसोबत बांधली लग्नगाठ

WhatsApp Group

Ruturaj Gaikwad Marriage : भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार विवाहबंधनात अडकले आहेत. शनिवारी (3 जून) मुंबईत हा विवाहसोहळा पार पडला. ऋतुराजने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी ऋतुराज हा लंडनमध्ये भारतीय संघासोबत असायला हवा होता, पण लग्नाची तारीख निश्चित झाल्यामुळे त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याला स्टँडबाय म्हणून समाविष्ट करण्यात आले. ऋतुराज गायकवाड आयपीएलमधील पाचवी ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचाही एक भाग होता. गायकवाडने IPL 2023 मध्ये 590 धावा केल्या होत्या.

ऋतुराज गायकवाडची बायको उत्कर्षा पवार ही देखील क्रिकेटपटू आहे. ती महाराष्ट्रासाठी क्रिकेट खेळते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2023 ची फायनल जिंकल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा यांचा ट्रॉफीसोबत फोटो काढण्यात आला. उत्कर्षा पवार अष्टपैलू खेळाडू आहे. 13 ऑक्टोबर 1998 रोजी जन्मलेली उत्कर्षा लहानपणापासूनच खेळात सक्रिय होती. तिने वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

हेही वाचा – Aadhaar : तुम्ही तुमचं ‘आधार’ अपडेट केलंय का? करायचंय तर ‘असं’ करा!

ऋतुराज गायकवाडने 2021 मध्ये दमदार कामगिरी करून आपला ठसा उमटवला. त्याने आयपीएल 2021 मध्ये 16 सामन्यात 635 धावा केल्या आणि यावेळी आयपीएल 2023 मध्ये त्याने 16 सामन्यांमध्ये 590 धावा केल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment