

IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे. गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसेल. हंगामाच्या मध्यभागी धोनीला सीएसकेची जबाबदारी स्वीकारावी लागण्याची ही दुसरी वेळ आहे, याआधी आयपीएल २०२२ मध्ये धोनीने रवींद्र जडेजाच्या जागी संघाची जबाबदारी स्वीकारली होती. चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी गुरुवारी याची पुष्टी केली.
आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. ऋतुराजच्या नेतृत्वाखाली संघाने फक्त एकच सामना जिंकला आहे. आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता पण तेव्हापासून संघाने सलग चार सामने गमावले आहेत. चेन्नई सुपर किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर पडला आहे. कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. गेल्या हंगामातही, त्याच्या नेतृत्वाखाली, संघ पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर राहिला आणि प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. यावेळीही संघाला पाच पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आणि तो पॉइंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीने संघाला पाच आयपीएल जेतेपदे (२०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३) जिंकून दिली आहेत आणि तो स्पर्धेतील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनी गेल्या काही वर्षांपासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!