

Sachin Tendulkar Affair Truth : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने 90 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. ‘हम’, ‘खुदा गवाह’, ‘आंखें’ अशा हिट सिनेमांमधून प्रसिद्धी मिळवलेली शिल्पा बिग बॉसमध्येही झळकली होती. मात्र एका चर्चेमुळे तिचं नाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत जोडलं गेलं!
शिल्पा-सचिन अफेअरच्या चर्चा कशा सुरू झाल्या?
शिल्पा शिरोडकरने एका जुन्या रेड एफएम मुलाखतीत सांगितलं की, ती सचिन तेंडुलकरला पहिल्यांदा भेटली होती तेव्हा ती ‘हम’ सिनेमाचं शूटिंग करत होती. शिल्पानुसार, “सचिन जिथे राहत होता, तिथेच माझा चुलत भाऊही राहत होता. दोघं एकत्र क्रिकेट खेळायचे. त्यामुळे त्या माध्यमातून आमची ओळख झाली.”
पुढे ती म्हणाली, “त्या काळात सचिन अंजलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण ते फारसं कुणाला माहीत नव्हतं. आम्हाला माहीत होतं कारण आम्ही सगळे मित्र होतो. पण एक अभिनेत्री सचिनला भेटतेय, इतकंच पाहून अफवा उडाल्या.”
सचिनचं स्पष्टीकरण: “आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो!”
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सचिन तेंडुलकरला विचारण्यात आलं होतं, “तुमच्याबद्दल तुम्ही ऐकलेली सर्वात स्टुपिड गोष्ट कोणती?” त्यावर सचिन म्हणाला होता, “हेच की माझा आणि शिल्पाचं अफेअर होता, जे पूर्णपणे खोटं आहे. आम्ही दोघं एकमेकांना नीट ओळखतही नव्हतो.”
हेही वाचा – लग्नानंतर लफडं..! भारतातील ‘या’ शहरात सर्वात जास्त अफेअर्स, रिपोर्ट वाचून हादराल!
दोघांचं आजचं आयुष्य
सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांचं लग्न 24 मे 1995 रोजी झालं. अंजली त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी असून, त्यांना एक मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा आहेत. अर्जुन आता क्रिकेटच्या मैदानात आपलं नशिब आजमावत आहे.
दुसरीकडे, शिल्पा शिरोडकरही आता वैवाहिक जीवन जगतेय. तिचं लग्न बँक ऑफ इंग्लंडमध्ये कार्यरत असलेल्या अप्रेश रंजीत यांच्याशी झालं असून, त्यांना एक मुलगी आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!